महिला मेळाव्यासह हळदीकुंकू कार्यक्रमात बोलक्या बाहुल्यांतून प्रभावी जनजागृती

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगाव यथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे संकल्पनेतून जिल्हा भरात सद्यस्थितीमध्ये दशसूत्री हा उपक्रम यशस्वीरित्या सुरू आहे.
या उपक्रमाचा भाग म्हणून आदरणीय जिल्हाधिकारी महोदय यांचे संकल्पनेतून आणि अश्विनी लाठकर शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे मार्गदर्शनात मुख्याध्यापक नामदेव साखळे
यांच्या आयोजनातून दशसूत्री कार्यक्रमांतर्गत महिला मेळावा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात झाला. 

या कार्यक्रमात महिलांसाठी सामाजिक, आरोग्यविषयक व शैक्षणिक जनजागृतीवर विशेष भर देण्यात आला. या प्रसंगी मिना वाघ होत्या. तर प्रमुख पाहुने सरला कामे होत्या. यांनी बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून मुलींवर होणारे अत्याचार, गुड टच व बॅड टच याविषयी सुलभ व परिणामकारक
पद्धतीने मार्गदर्शन केले. लहान मुलींनी कोणत्या स्पर्शाला योग्य व अयोग्य म्हणावे, स्वतःचे संरक्षण कसे करावे, तसेच अशा प्रसंगी कोणाकडे तक्रार करावी याबाबत त्यांनी महिलांना जागरूक केले. तसेच सिकलसेल अॅनिमिया या अनुवांशिक आजाराबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. सिकलसेल आजाराची लक्षणे, तपासणीचे महत्त्व, वेळेवर उपचार व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत महिलांमध्ये जनजागृती

करण्यात आली. कार्यक्रमात उपस्थित महिलांना सरला कामे यांनी मार्गदर्शन करताना, महिलांनी स्वतः सजग राहून कुटुंबातील मुलींचे संरक्षण करावे, आरोग्यविषयक तपासणीकडे दुर्लक्ष करू नये. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ह पुढाकार घ्यावा असे आवाहन वि केले. पंजाबराव देशमुख, अजीम उ दस्तगीर देशमुख सारिका नागे, व शारदा कुमाकर, सुरेखा थोरात, दिपाली, गलम, बुश्रा सुलताना, लुबना सय्यद, नुझत आलिया सिद्दीकी आदी शिक्षकवृंद व शे पालक महिला शाळा मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांचे सामुहीक खेळ घेण्यात आले.

महिलांनी या उपक्रमाचे कौतुक करत असे कार्यक्रम श अधिक प्रमाणात आयोजित श करण्याची मागणी केली. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक नामदेव साखळे यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रमाचा शे समारोप केला.